आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पीएमपी बसमध्ये सोन्याची चैन चोरणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 14, 2022
Spread the love

स्वारगेट पोलिसांची कारवाई : १० ग्रॅम सोन्याची चैन केली हस्तगत

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : बसमध्ये गर्दीचा फायदा घेत २५ हजार रुपयांची सोन्याची चैन चोरणाऱ्यास स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १० ग्रॅम सोन्याची चेन हस्तगत केली.

सचिन दत्तात्रय जाधव (वय ४५, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, कमलाबाई श्रीरंग लोया (वय ७५, रा. मित्तल हाईट्स, पुणे) यांनी भारती विद्यापीठ-स्वारगेट दरम्यान बसमध्ये १० ग्रॅम वजनाची २५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन चोरीला गेल्याची तक्रार स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. पोलिसांना सूत्रांकडून आरोपीची माहिती मिळताच, आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आणि आरोपीने चोरी केलेली १० ग्रॅम सोन्याची चेन हस्तगत केली.

अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सुषमा चव्हाण, स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ए. के. रसाळ, येवले, कांबळे, साळवे, वाबळे, शेख, खेंदाड, बडे, भोकरे, ढावरे, दळवी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();