आवृत्ती पुणे
← Back to Homepage

स्पा सेंटर चालकाला धमकी देणारा तोतया पोलीस जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 9, 2022
Spread the love

वाकड पोलिसांत फिर्याद : एक लाख रुपये दे नाहीतर व्हिडीओ व्हायरल करेन

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पोलीस असल्याचे सांगून एकाने स्पा मसाज सेंटर चालकाकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली. तसेच यातील काही रक्कम आरोपीने स्विकारली. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.7) पिंपरी चिंचवड (पिंपळे सौदागर) येथे घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

विशाल कैलास जौंजाळे (वय 28, रा. हिंजवडी रोड, शिंदे वस्ती, मारुंजी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अविनाश शांताराम शिंदे (वय 26 रा. दौलत प्लाझा, कोपर आळी, लोहगाव, ता. हवेली) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी विशाल जौंजाळे हा रिअल इस्टेटमध्ये एजंट म्हणून काम करतो. तर शिंदे यांचा पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकात स्पा मसाज सेंटर आहे. आरोपी विशालने त्यांना पोलीस असल्याचे सांगितले. त्यानंतर स्पा मसाज सेंटरमध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत कार्यवाही न करण्यासाठी एक लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच पैसे न दिल्यास स्वत:कडे असलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपीने शिंदे यांना स्पा मसाज सेंटरची आणि त्यामध्ये काम करणाऱ्या मुलींची बदनामी करण्याची धमकी देऊन स्पा सेंटरमध्ये 5 हजार रोख आणि एक हजार ऑनलाइन स्विकारले. त्यानंतर आरोपीने शिंदे यांच्याकडे ७० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची आणि पोलिसांना सांगून कार्यवाही करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संभाजी जाधव करीत आहेत.

get_footer();