आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चोरीची बुलेट वापरणाऱ्यास केले जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 20, 2022
Spread the love

डेक्कन पोलिसांची कामगिरी : ६० हजार रुपयांची बुलेट हस्तगत

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : चोरीची बुलेट वापरणाऱ्यास डेक्कन पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून ६० हजार रुपये किमतीची बुलेट हस्तगत केली आहे.संदीप कोंडिबा गोरे (वय २३, रा. अर्चिड आपटे रोड, डेक्कन, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

डेक्कन पोलीस स्टेशनमधील अधिकारी-कर्मचारी नदीपात्रातील एस.एम. जोशी पुलाखाली गस्तीवर होते. त्यावेळी बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीला संशयावरून पकडले. त्याच्याकडे लायसन्स व कागदपत्र नसल्याने बुलेटगाडीविषयी विचारले असता, त्याने आपटे रोड येथील एचडीएफसी बँकेसमोरील पार्किंगमधून चोरल्याची कबुली दिली. मयूर माळवदकर यांनी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये चौकीमध्ये बुलेट चोरीला गेल्याची फिर्याद असल्याने ६० हजार रुपये किमतीचा बुलेट जप्त केली.

अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त रमाकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या अधिपत्याखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंदे, दादासाहेब बर्डे, सचिन चव्हाण, शेखर शिंदे, प्रवीण कांचन यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();