आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सुमेरू बिल्डकॉनच्या विजय रायकर यांच्यासह तिघांविरूध्द गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 6, 2022
Spread the love

सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : कंपाऊंड तोडून आणि रस्ता खोदून ऑफिस बांधले

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सुमेरु बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड बांधकाम कंपनीच्या चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर विजय रवींद्र रायकर, श्रीकांत शेटे आणि गणेश पोकळे यांच्या विरोधात सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एप्रिल 2020 ते 12 एप्रिल 2021 या कालावधीमध्ये घडला. जागेमध्ये असलेले कंपाउंड तोडून रस्ता खोदून ऑफिस बांधल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी विजय दशरथ कदम (वय 57, रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतिभा तांदळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय कदम आणि त्यांच्या आई व भाऊ यांच्या मालकीचा धायरी येथे भूखंड आहे. धायरीमधील सर्वे नंबर 150/3 व 150/1, प्लॉट क्रमांक 18 या चार क्षेत्रांमध्ये सुमेरू बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेडने बेकायदेशीर ऑफिस बांधले. कदम आणि त्यांच्या नातेवाईकांची कोणतीही परवानगी न घेता प्लॉटचे कंपाउंड तोडून रस्ता खोदला. तसेच तेथे ऑफिस बांधून फिर्यादी आणि जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचा रस्ता अडविल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. कदम यांच्या फिर्यादीवरून सिंहगड रोड पोलीस ठाण्यात 341, 447, 427, 34 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतिभा तांदळे करीत आहेत.

get_footer();