आवृत्ती पुणे
← Back to Homepage

टॅलेंट शो, उखाणे आणि नृत्यांच्या खेळात रंगला महिला दिन

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 9, 2022
Spread the love

शिवाजीनगर मुख्यालय : महिला पोलिस अधिकारी-अंमलदारांनी घेतला सहभाग

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : टॅलेंट शो, उखाणे, नृत्यांच्या खेळात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिला अधिकारी-अंमलदार यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील रिक्रेशन हॉलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

याप्रसंगी पोलीस आयुक्त यांच्या धर्मपत्नी जुगनू गुप्ता, अपर पोलीस आयुक्त यांच्या धर्मपत्नी स्वाती पोकळे, पोलीस उपायुक्त धर्मपत्नी तेजश्री पवार, परिमंडल-२चे पोलीस उपायुक्त यांच्या धर्मपत्नी पाटील, पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, नम्रता पाटील, पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, रुक्मिणी गलांडे, आरती बनसोडे उपस्थित होत्या. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देवून सन्मानित करण्यात आले. आर. जे. संग्राम ऊर्फ बंड्या यांनी सूत्रसंचालन केले.

get_footer();