आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वेबसाईटवरील बनावट अकाऊंटद्वारे तरुणीचा विनयभंग

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 20, 2022
Spread the love

विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद : इंटरनेटवरून पाठलाग करत केली अश्लील शिवीगाळ

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क


पुणे : तरुणीच्या नावाने वेगवेगळ्या वेबसाईटवर बनावट अकाऊंट तयार करुन त्यावर त्यांच्यासाठी अश्लिल शिव्यांचा वापर करुन तरुणीचा वियनभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार जून २०२१ पासून जानेवारी २०२२ पर्यंत सुरु होता.

धानोरीतील २८ वर्षाच्या तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी केतन बाळकृष्ण सांडभोर (वय ३२, रा. राजगुरुनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने वेगवेगळ्या वेबसाईटवर फिर्यादी यांचे फेक अकाऊंट तयार केले. त्याचा इंटरनेटच्या माध्यमातून पाठलाग करुन त्या अकाऊंटवर त्यांच्यासाठी अश्लिल शिव्यांचा वापर करुन त्यांचा विनयभंग केला. हा प्रकार फिर्यादी यांना माहिती झाल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक मगदुम अधिक तपास करीत आहेत.

get_footer();