आवृत्ती पुणे
← Back to Homepage

तरवडेवस्ती येथे रिक्षाच्या धडकेत एकाचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 3, 2021
Spread the love

वानवडी पोलिसांत गुन्हा : मद्यपान करून चालवित होता रिक्षा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : घोरपडी बाजार येथील आर्मी पब्लिक स्कूल शेजारील रोडवर पॅगो रिक्षाची धडक बसून एकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १ नोव्हेंबर २०२१) दुपारी पावणेचारच्या सुमारास आर्मी पब्लिक स्कूलशेजारील रोडवर घोरपडी बाजार येथे घडली.

सुनील शंकर बेंगळे (वय ५५, रा. वेदांत हाईट्स, तरवडेवस्ती, महंमदवाडी रोड, हडपसर) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सलिम शरीफ शेख (वय २९, रा. बी. टी. कवडे रोड, मुंढवा, पुणे) याला अटक केली आहे. याप्रकरणी आकाश बेंगळे (वय २९, रा. महंमदवाडी रोड, हडपसर, पुणे) यांनी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, सलिम शरीफ शेख विनापरवाना पॅगो रिक्षा मद्यप्राशन करून घोरपडी बाजार येथील आर्मी पब्लिक स्कूलशेजारील रोडवर चालवित होता. यावेळी तरवडेवस्ती-महंमदवाडी रोडवर सुनील शंकर बेंगळे यांना रिक्षाची जबर ठोस बसून अपघात झाला. या अपघातात सुनील बेंगळे यांचा मृत्यू झाला. वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भूषण पोटवडे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();