आवृत्ती पुणे
← Back to Homepage

टीईटीतील सबएजंट व म्हाडा पेपरफुटीप्रकरणी एकाला हातकड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 20, 2022
Spread the love

पुणे पोलिसांची नाशिकमध्ये कारवाई : परीक्षार्थींना एकत्र करून घेतले होते पैसे

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षाच्या परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. टीईटी परीक्षेत परिक्षार्थींना एकत्र करुन त्यांच्याकडून पैसे घेऊन ते मुख्य एजंट संतोष हरकळ याला देणाऱ्या सब एजंटला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

राजेंद्र विनायक सोळुंकी (वय 52, रा. अमोदे, ता. नांदगाव, जि. नाशिक) असे या एजंटाचे नाव आहे. टीईटी परीक्षेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांनी स्वप्निल पाटील याला अटक करुन त्याच्याकडे सखोल चौकशी केली. चौकशीमध्ये त्याने राजेंद्र सोळुंकी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पुणे पोलिसांनी नाशिक येथून सोळुंकी याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने 2019-20 च्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये काही परीक्षार्थींची नावे स्वप्निल पाटील याला दिल्याची माहिती दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

पुणे सायबर पोलिसांनी शुक्रवारी (दि.18) मुकुंदा जगन्नाथ सूर्यवंशी (वय-33 रा. अगोदे, ता. नांदगाव जि. नाशिक) याला अटक केली होती. त्याने 2018 च्या टीईटी परीक्षेत परीक्षार्थींना पात्र करण्यसाठी ऑक्टोबर 2018 मध्ये परीक्षार्थींची यादी दिली होती. राजेंद्र आणि सूर्यवंशी हे दोघे एकाच गावचे राहणारे असल्याने त्या दोघांनी मिळून हा गुन्हा केला आहे. सोळुकी हा देखील एजंट म्हणून काम करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अंकुश हरकळ व संतोष हरकळ या दोन प्रमुख एजंटांकडे केलेल्या चौकशीत म्हाडा पेपर फुटीबाबत एका एजंटची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी दीपक विक्रम भुसारी (वय-32 रा. अयोध्यानगर, बुलडाणा) याला अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दीपक भुसारी याला 24 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, आर्थिक व सायबर उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भालेराव, कदीर देशमुख, पोलीस उपनिरीक्षक वाघमारे, सागर पडवळ, पोलीस अंमलदार प्रविण राजपूत, सौरभ घाटे, आदेश चलवादी, दिनेश मरकड, बाबासाहेब कराळे, अनिल पुंडलिक यांनी ही कारवाई केली.

get_footer();