आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दारूच्या दुकानावर दरोडा टाकणाऱ्या सहा आरोपींना दोन तासात अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • May 30, 2023
Spread the love

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : भारती विद्यापीठ परिसरातल्या एका दारूच्या दुकानात हप्त्यासाठी धमकावणाऱ्या आणि दुकानात तोडफोड करून नुकसान करणाऱ्या सहा जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन तासात अटक केली. अजय पांचाळ, तेजस वाडेकर, सोहेल आसंगी, गोविंद लोखंडे, सोन्या कांबळे व अमोल ढावरे अशी अटक केलेल्यांची नाव आहे.

24 मे रोजी फिर्यादी त्यांच्या दुकानात काम करताना आरोपींनी येऊन शिवीगाळ करत दुकानातला सर्व माल, टीव्ही यांचे नुकसान केले. दुकानाच्या मालकाला फोन करून हप्ता देण्यासाठी धमकावले. तसेच अजय पांचाळ याने दुकानातल्या काऊंटरमध्ये असलेले रोख दहा हजार रूपये काढून घेतले. त्यानंतर फिर्यादींनी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर आरोपींचा शोध घेताना पोलिस अंमलदार अभिजीत जाधव, राहुल तांबे, विक्रम सावंत यांना मिळालेल्या खबरीनुसार, आरोपींना तसेच गुन्ह्यातल्या विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले.
ही कारवाई परिमंडळ २ च्या पोलीस उप आयुक्त स्मार्तना पाटील, स्वारगेट विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, सचिन धामणे, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, राहुल तांबे, विक्रम सावंत, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, सचिन गाडे, धनाजी धोत्रे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, नितीन जाधव यांच्या पथकाने केली आहे.

get_footer();