आवृत्ती पुणे
← Back to Homepage

धायरीमध्ये ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 13, 2021
Spread the love

सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : दुचाकीवरील चोरट्यांनी डाव साधला

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

गर्दी आणि निर्जन मनुष्यवस्तीच्या ठिकाणी चोरट्यांनी मोबाईल आणि मंगळसूत्राची चोरी करणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

ज्येष्ठ महिला भाजीपाला खरेदी करण्यासाठी जात होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले. धायरीतील बेनकर वस्ती येथे ९ सप्टेंबर रोजी दुपारी दीड ते पावणे दोनच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी ६० वर्षीय महिलेने मोटारसायकलवरील चोरट्यांविरुद्ध सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिला शारदा निकेतन गार्डन गौरी शंकर पार्कसमोर बनकरवस्ती, धायरी येथे भाजीपाला खरेदी करण्यासाठी पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरील आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले.

सिंहगड रोड पोलीस स्टेशनमधील महिला सहायक पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();