आवृत्ती पुणे
← Back to Homepage

‘कानून के हाथ बहुत लंबे होते है!

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 19, 2021
Spread the love

पोलिसांना गुंगारा देणाऱ्या फरारी आरोपीला ४१ वर्षांनी ठोकल्या बेड्या

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : ‘कानून के हाथ बहुत लंबे होते है, कानुन के हाथ से कोई मुजरीम नही छूट सकता’ अशी हिंदीत म्हण आहे. कायद्याचे हात किती लांब असू शकतात याचा प्रत्यय पुण्यात नुकताच एका घटनेत आला आहे. 1980 साली जबरी दरोडा टाकून रोकड आणि दागिने घेऊन पळालेल्या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला तब्बल 41 वर्षानंतर अटक केली आहे. आरोपी मागील अनेक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांनी अत्यंत शिताफिने सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अंकुश माणीक गायकवाड (वय 58, रा. खडकी, ता करमाळा जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी गायकवाडने आपल्या अन्य 8 साथीदारांच्या मदतीने यवत (ता. दौंड) येथे जबरी दरोडा टाकला होता. हा गुन्हा केल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले होते. मात्र, यातील सहा आरोपींना यापूर्वी अटक केली असून, गायकवाड याच्यासह तिघेजण मागील 41 वर्षापासून पोलिसांना चकवा देत होते.

दरम्यान, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी नुकतेच जिल्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार पोलिसांनी जुन्या रेकॉर्डवरील फरार आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गायकवाड खडकी (ता. करमाळा) रोडवर जनावरं चारायला गेला असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सापळा रचला आणि आरोपी अंकुश गायकवाड याला अटक केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आरोपीने 1980 साली यवत याठिकाणी दरोडा टाकल्याची कबुली दिली.

या गुन्ह्यातील अन्य दोन आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा तपास करीत आहेत.

get_footer();