आवृत्ती पुणे
← Back to Homepage

तीन तरुणांवर धारदार हत्याराने सपासप वार करणाऱ्यांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • May 11, 2022
Spread the love

शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद : शिवाजीनगर पोलीस वसाहतीसमोर घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : किरकोळ वादातून तीन तरुणांवर पालघन, कोयत्याने सपासप वार करणाऱ्या १८ ते २० जणांवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी (दि. ९ मे २०२२) रात्री साडेबाराच्या सुमारास शिवाजीनगर येथील पोलीस वसाहती समोर घडली.

हर्षद शांताराम शेटे, विशाल शेटे व त्यांचा मित्र संकल्प मोरे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हर्षद शांताराम शेटे (वय 21, रा. शिवाजीनगर पोलीस लाईन, मॉर्डन कॉलेजसमोर, शिवाजीनगर) याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, जंगली महाराज रोडवरील झाशीची राणी चौकात हर्षद, विशाल आणि संकल्प यांची दुचाकीवरील दोघांसोबत रविवारी (दि.8) रात्री साडेदहाच्या सुमारास वादावादी झाली होती. याच वादाचा राग मनातधरुन सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास 18 ते 20 जण शिवाजीनगर पोलीस वसाहत समोरील रस्त्यावर आले. त्यांनी परिसरात दहशत माजवत हर्षद आणि विशाल या भावंडासह त्यांचा मित्र संकल्प याच्यावर वार करुन गंभीर जखमी केले.
त्यानंतर आरोपी पळून गेले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नाईक करीत आहेत.

get_footer();