आवृत्ती पुणे
← Back to Homepage

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 12, 2022
Spread the love

कोंढवा पोलिसांत फिर्याद : उंड्री चौकातील पंजाब नॅशनल बँकेजवळ घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : उंड्री चौकातील पंजाब नॅशनल बँकेसमोर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. उंड्री चौकात ९ मार्च २०२२ रोजी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला.

इमरान सलीम जकारिया (वय ३०, रा. मॅजेस्टिक पार्क, वडाचीवाडी, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी
शकील जकारिया (वय ४३, रा. वडाचीवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात मोटारसायकलस्वारावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, दुचाकीस्वार उंड्री चौकातील पंजाब नॅशनल बँकेजवळील रस्त्याने जात होते, त्यावेळी ट्रकची धडक बसून अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार पुढील तपास करीत आहेत.

get_footer();