आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अज्ञात वाहनाच्या ध़डकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 2, 2022
Spread the love

कोरेगाव पार्क पोलिसांत गुन्हा: २९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी तीन ते सायंकाळी पाचच्या दरम्यान घडला अपघात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कोरेगाव पार्क (नॉर्थ मेन रोड, योगी पार्क सोसायटी) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृ्त्यू झाला. ही घटना २९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी तीन ते सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली.

अर्जुन हौसा जोगदंड (वय ७१, रा. कॅम्प, पुणे) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा किशोर जोगदंड (वय ४५, रा. कॅम्प, पुणे) यांनी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीला कोरेगाव पार्क येथील नॉर्थ मेन रोड, योगी पार्क सोसायटीजवळ अज्ञात वाहनाची धडक बसली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले, त्यांच्या डोक्याला मार लागल्याने उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कांबळे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();