आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 19, 2021
Spread the love

वाहनचालक फरार : हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी उड्डाण पुलावरील घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी उड्डाण पुलावर अज्ञात वाहनाची मोटारसायकलला धडक बसली. या अपघातात मोटारसायकस्वार गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना १५ सप्टेंबर २०२१ रात्री अकरा ते १६ सप्टेंबर २०२१ सकाळी सहाच्या सुमारास घडली.

सागर दरिअप्पा बंडगर (वय २८, रा. रत्नदीप हाऊस, विश्रांती पार्क, उरुळी देवाची, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दत्तात्रय चव्हाण (वय ३१, रा. आशीर्वाद सोसायटी, फुरसुंगी, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, हडपसर-सासवड रस्त्यावर फुरसुंगीतील उड्डाण पुलावर अज्ञात वाहनाची मोटारसायकला धडक बसून अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक एस. एस. गोसावी करीत आहेत.

get_footer();