“यु. टी. पवार यांचे डी.आय.जी. पदावर प्रमोशन”
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र कारागृह विभागातील ज्येष्ठ अधिकारी यु.टी. पवार यांची नुकतीच डी.आय.जी. पदावर (औरंगाबाद) संभाजीनगर येथे पदोन्नती झाली आहे.
यु.टी. पवार हे 1998 पासून कारागृह विभागात उपअधीक्षक ते डीआयजी पदापर्यंत कायमच आपल्या कार्यपद्धती व कर्तव्यनिष्ठेमुळे चर्चेत राहिले. कारागृहाच्या शासकीय जागेवरील अतिक्रमण असो किंवा मोठमोठ्या अंडरवर्ल्ड, गँगस्टर आरोपी यांचा कर्दनकाळ असो, किंवा कोरोना सारख्या नैसर्गिक महामारीच्या संकटात असो, त्यांनी कायमच आपल्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी छाप कठोर प्रशासक, शिस्तप्रिय अधिकारी आणि त्याचवेळी गरीब कैदी व सहकारी कर्मचारी यांच्या बाबतीत सहिष्णू अशा विविध भूमिका फार कौशल्याने पार पाडल्या. येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदी जनांसाठी अनेक कल्याणकारी उपक्रम त्यांनी राबविले. त्याचप्रमाणे विशेष म्हणजे कोरोना काळात आपल्या सर्व सहकारी स्टाफ सहित त्यांनी दोन वेळा 21 दिवसांसाठी स्वतःला कारागृहात विलग ठेवले होते. आपल्या कार्यपद्धतीमुळे कायमच चर्चेत राहिलेले पवार आता डीआयजी पदाची जबाबदारी देखील उत्तमपणे पार पाडतील अशी चर्चा आहे.
