आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वडकीनाला येथे टेम्पोच्या धडकेत स्कूटर चालकाचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 7, 2022
Spread the love

लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : अपघातानंतर टेम्पोचालक पळून गेला

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : फुरसुंगी-सासवड रस्त्यावर विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव टेम्पोची स्कूटर चालकाला धडक बसून अपघात झाला. या अपघातात स्कूटरचालकाला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. सासवड रस्त्यावर वडकीनाला येथे शनिवारी (दि. ५ मार्च २०२२) रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर टेम्पोचालक पळून गेला.

नवनाथ रामचंद्र जाधव (वय ४१, रा. सप्तश्री अपार्टमेंट, फुरसुंगी, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
नागेश जाधव (वय ३८, रा. माऊली पाडाळे, म्हाळुंगे गावठाण, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फुरसुंगी-सासवड रस्त्यावर फिर्यादीचे भाऊ नवनाथ जाधव यांना विरुद्ध दिशेने भरधाव टेम्पोची धडक बसून अपघात झाला. या अपघातात त्यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पोचालक न थांबता पळून गेला. लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक बिडवे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();