आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वाहतूक पोलिसाला 5 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 20, 2022
Spread the love

लाचलुचपत विभागाची कारवाई : मालवाहू गाडीवर कारवाई न करण्यासाठी मागितली लाच

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यातील पोलिस कर्मचाऱ्याला 5 हजाराची लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. दिलीप दत्तू फुंदे (वय 34, पोलीस कॉन्स्टेबल, बंडगार्डन वाहतूक विभाग, पुणे शहर) असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, वाहतूक पोलिस कर्मचारी दिलीप दत्तू फुंदे यांनी शुक्रवारी (दि. 18 फेब्रुवारी) 7 हजाराची लाच मागितली होती. तक्रारदार यांच्या ताब्यातील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची जिनेओ मालवाहू गाडी ही इन्शुरन्स नसल्याने व रजिस्ट्रेशन संपल्याने बंडगार्डन वाहतूक विभाग (पुणे शहर) या ठिकाणी अडकवून ठेवली होती. सदरचे वाहन आरटीओकडे न पाठवण्यासाठी व कारवाई न करता सोडून देण्यासाठी दिलीप दत्तू फुंदे यांनी 7 हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती 5 हजार रुपये मागणी करून ते स्वीकारले असता त्यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुरज गुरव आणि अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मारदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदिप वऱ्हाडे, पो.ना. किरण चिमटे, पोलीस नाईक वैभव गिरीगोसावी, पोलीस शिपाई अंकुश आंबेकर आणि चालक पोलीस शिपाई माळी यांच्या पथकाने केली आहे.

get_footer();