आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वाहन आणि मोबाईल चोरीतील दोघांच्या मुसक्या आवळल्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 30, 2021
Spread the love

लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी : ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : वाहन आणि मोबाईल चोरीतील दोघांच्या लोणी काळभोर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपींकडून विवो कंपनीचा मोबाईल, लोखंडी कोयता, रॉड, हिरो होंडा मोटारसायकल असा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

वैभव राजाराम तरंगे (वय १९, रा. गोळीबार मैदान, भवरापूर, ता. हवेली, मूळ रा. मु.पो. वाकडी, ता. पराडा, जि. उस्मानाबाद), राजेंद्र दत्तात्रय मुसळे (वय १९, सध्या रा. आनंदवन सोसायटी, फ्लॅट नं.२३, डांगे चौक, पिंपरी, मूळ रा. कोरेगाव मूळ, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, मोबाईल आणि वाहन चोरीतील संशयितांची माहिती सूत्रांकडून पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी संशयावरून दोघांना ताब्यात घेऊन तपास करून विवो कंपनीचा मोबाईल, गुन्ह्यात वापरलेले हत्यार एक लोखंडी कोयता, एक रॉड व एक हिरो होंडा मोटारसायकल असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे (गुन्हे), तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, जयंत हंचाटे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, पोलीस नाईक सुनील नागलोत, श्रीनाथ जाधव, अमित साळुंखे, संभाजी देविकर, पोलीस शिपाई वसंत चव्हाण, बालाजी बांगर, राजेश दराडे, निखील पवार, बाजीराव वीर, शैलेश कुदळे यांच्या पथकाने दमदार कामगिरी केली.

get_footer();