आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वाहनचोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • May 4, 2022
Spread the love

गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ची कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : वाहनचोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ने बेड्या ठोकल्या. आरोपीकडून २,९५,००० रुपये किमतीच्या आठ मोटरसायकल आणि दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत.

बच्चनसिंग जोगेंदरसिंग भोंड (वय २३, रा. बिराजदारनगर, हडपसर, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२चे पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप व पोलीस अंमलदार वानवडी, हडपसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ०१/०५/२०२२ रोजी गस्त घालत होते. त्यावेळी वैदवाडीजवळील नवीन पुलालगत संशयित गाडीवर थांबल्याची माहिती पोलीस नाईक शिवाजी जाधव यांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयावरून आरोपीला ताब्यात घेऊन तपास केला असता, त्याने पुणे, सोलापूर असे विविध ठिकाणाहून वाहने चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीवर लोणीकंद, हडपसर-४, मोहोळ पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण, शिवाजीनगर, वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असून, इतर 2 वाहनांबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, पोलीस अंमलदार उदय काळभोर, राजेश लोखंडे, विनायक रामाने, शाकिर खान, शिवाजी जाधव, गणेश लोखंडे, सुदेश सपकाळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();