आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वाहनचोराला अटक करून चार दुचाक्या केल्या जप्त

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 4, 2022
Spread the love

गुन्हे शाखेच्या युनिट-३ची दमदार कामगिरी : वारजे-माळवाडी येथे केली कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : वाहनचोरीच्या पार्श्वभूमीवर तपास सुरू करीत वाहनचोराला अटक करून, चार दुचाकी जप्त केल्या. गुन्हे शाखेच्या युनिट-३च्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.

अक्षय अप्पा गायकवाड (वय १९,रा. मराठा महासंघ सोसायटी, शास्त्रीनगर, कोथरूड, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनिट-३कडून सुरू होता. दरम्यान, वारजे-माळवाडी हद्दीमध्ये डुक्करखिंडी येथे आम्रपाली हॉटेलशेजारी चोरी केलेली दुचाकी घेऊन थांबल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडे अधिक तपास करून ९५ हजार रुपयांच्या चार दुचाकी जप्त केल्या असून, कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीमधील चार गुन्हे उघडकीस आणले आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार महेश निंबाळकर, संतोष क्षीरसागर, राजेंद्र मारणे, रामदास गोणते, सुजीत पवार, राकेश टेकावडे, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();