आवृत्ती पुणे
← Back to Homepage

विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईताला ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 7, 2022
Spread the love

गुन्हे शाखा खंडणीविरोधी पथक-1ची कारवाई : देशी बनावटीचे एक पिस्टल आणि एक जिवंत काडतुसे जप्त

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-1च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल आणि एक जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. डेक्कन येथील नदीपात्रातील पांचाळेश्वर मंदिरासमोर मंगळवारी (दि.5) ही कारवाई केली.

अजय शंकर सुतार (वय 19, रा. जाधव अपार्टमेंट फ्लॅट क्र.9, दत्त मंदिराशेजारी, गोसावी वस्ती, वडगाव बुद्रुक, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट कलम-3 (25) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-1चे पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस नाईक नितीन रावळ यांना पांचाळेश्वर मंदिरासमोर नदीपात्र डेक्कन पुणे येथे अजय सुतार देशी बनावटीचे एक गावठी पिस्टल जवळ बाळगून फिरत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस सापडले. अटक करण्यात आलेला आरोपी अजय सुतार हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दोन तर कोथरुड पोलीस ठाण्यात एक आर्म अ‍ॅक्टचे गुन्हे दाखल आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अमलदार नितीन कांबळे, राजेंद्र लांडगे, विवेक जाधव, प्रफुल्ल चव्हाण, नितीन रावळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();