आवृत्ती पुणे
← Back to Homepage

विनयभंग करून फरार झालेल्या आरोपीला शेगाव येथून केली अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • May 11, 2022
Spread the love

चंदननगर पोलिसांची कामगिरी – तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी केला तपास

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : महिलेचा विनयभंग करुन फरार झालेल्या आरोपीचा पोलिसांनी शेगाव येथून अटक केली. चंदननगर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून रविवारी (दि. ८ मे २०२२) कारवाई केली.

अब्दुल वाहिद शेख (रा. माळीवाडी, पाचपीरचावडी, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी चंदननगर पोलीस ठाण्यातील तपास पथक रविवारी (दि.8) अहमदनगर येथील त्याच्या राहत्या घरी गेले होते. मात्र, आरोपी सापडला नाही. पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करुन आरोपी अब्दुल शेख याला सोमवारी (दि.9) शेगाव येथुन अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल थोपटे करीत आहेत.

चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पावले, पोलीस अंमलदार नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड, अविनाश संकपाळ, तुषार भिवरकर, महेश नाणेकर, श्रीकांत शेडे, अतुल जाधव, राहुल इंगळे, अमित कांबळे, गणेश हांडगर, विक्रांत सासवडकर यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.

get_footer();