आवृत्ती पुणे
← Back to Homepage

विनयभंगाच्या प्रकरणातील डॉक्टराचे अपहरण करुन लुटले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 10, 2022
Spread the love

कोंढवा पोलिसांत चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : आजारावर औषध घेण्यासाठी आलेल्या एका 22 वर्षाच्या तरुणीला तपासताना तिचा विनयभंग केल्याचा सुहेल बाबासाहेब तांबोळी या डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या डॉक्टराने चौघा जणांनी आपल्याला क्लिनिकमधून जबरदस्तीने ओढून जवळच्या गल्लीत नेऊन तेथे मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच गळ्यातील सोन्याची चैन व खिशातील ६ हजार रुपये जबरदस्तीने लुटल्याचा दावा केला आहे.

सुहेल बाबासाहेब तांबोळी (वय ३६, रा. इशा बेला विस्टा, कोंढवा) असे या डॉक्टराचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, सुहेल तांबोळी याचे शिवनेरीनगर येथे तांबोळी क्लिनिक आहे. ७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता त्याच्याकडे एका 22 वर्षाची तरुणी उपचार घेण्यासाठी आली होती. डॉ. तांबोळी याने तिच्या कमरेवर इंजेक्शन देण्याच्या व तपासणी करण्याच्या बहाण्याने या तरुणीच्या शरीरावर नको तेथे जाणीवपूर्वक हात लावून तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात या डॉक्टराविरुद्ध फिर्याद दिली. कोंढवा पोलिसांनी ही फिर्याद घेऊन सायंकाळी साडेसहा वाजता डॉक्टरावर गुन्हा दाखल केला.

दरम्यान, डॉ. सुहेल तांबोळी याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे क्लिनिकमध्ये असताना 7 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता चार जण आले. त्यांनी तुम्हीच येथे डॉक्टर आहात का, असे फिर्यादीला म्हणून त्यांना जबरदस्तीने गल्ली नं. 20 मध्ये ओढत घेऊन गेले. तेथे असलेल्या एका घरामध्ये नेऊन दरवाजाला आतून कडी लावून फिर्यादीला बाहेर जाण्यास प्रतिबंध केला. त्यातील दोघांनी फिर्यादीचे हात दोरीने बांधले. चौघांनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडक्याने तसेच लोखंडी रॉड व बेल्टने मारहाण केली. तू त्या महिलेला नीट तपासले नाही. तिची माफी मागून तू पैसे कसे देत नाही ते पाहतो, असे म्हणून फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी देऊन गळ्यातील 30 हजार रुपयांची सोन्याची चैन व खिशातील 6 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गपाट तपास करीत आहेत.

get_footer();