आवृत्ती पुणे
← Back to Homepage

विठेश्वर मंदिरातील दानपेटीसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 7, 2022
Spread the love

वारजे पोलिसांत फिर्याद : मंदिर बंद असताना अज्ञात चोरट्याने केली चोरी

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : विठेश्वर मंदिरातील दान पेटीतील 9 हजार 500 आणि देवाच्या अंगावरील सोन्याचे दागिने असा एकूण 29 हजार 500 रुपयांचा ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. कर्वेनगरमधील विठ्ठेश्वर मंदिराचा दरवाजा उचकटून 4 एप्रिल सायंकाळी 7 वा. ते 5 एप्रिल 2022 रोजी सकाळी 6 च्या दरम्यान चोरी केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

बाळू सुर्वे (वय 54, रा. कर्वेनगर, पुणे) यांनी वारजे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांचे कर्वेनगरमध्ये दुधाने लॉनसमोर विठेश्वर मंदिर आहे. या मंदिरामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी, श्री दत्तात्रय, श्री हनुमान, श्री तुकाराम, श्री शंकर देवांच्या मूर्ती आहेत. फिर्यादी मंदिरात पुजेचे काम करतात. मंदिर 4 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता बंद केल्यानंतर अज्ञात चोरट्याने मंदिरातील दान पेटीतील रोख 9 हजार 500 रुपये रोख व देवाच्या अंगावरील सोन्याचे दागिने असा एकूण 29 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित काळे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();