आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वडाचीवाडी येथे ३५ लाखांचा गुटखा जप्त, तिघे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 4, 2022
Spread the love

कोंढवा पोलिसांत फिर्याद : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक१-ची कारवाई

महाराष्ट्र ३६०न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्रामध्ये विक्रीस बंदी असलेल्या गुटख्याचा मोठा साठा गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक-१च्या पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून, ३५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.१) कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडाचीवाडी येथे करण्यात आली.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार सुजित वाडेकर, संदिप जाधव, राहुल जोशी, मनोज साळुंके, विशाल दळवी, पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर, विशाल शिंदे, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव योगेश मोहिते यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();