आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वाँटेड असलेले दोन सख्खे भाऊ जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 19, 2021
Spread the love

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकची कामगिरी : आरोपी फरासखाना पोलिसांच्या ताब्यात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : विविध गुन्ह्यांत वाँटेड असलेल्या दोघा सख्खा भावांना जेरबंद करण्यात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकला यश मिळाले असून, दोन्ही आरोपींना फरासखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पुणे शहर आयुक्तालयाचे अभिलेखावरील तडीपार, पाहिजे, फरारी आरोपींचा शोध घेण्याचे अनुषंगाने दिनांक १६ सप्टेंबर रोजी पेट्रोलिंग करत फिरत असताना पोलीस नाईक धनंजय ताजणे व पोलीस अंमलदार सुमीत ताकपेरे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, फरासखाना पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल झालेले पाहिजे (वॉंटेड) आरोपी रहेमान चाँद शेख (वय २९, रा. कोंढवा, पुणे) आणि हानिफ चाँद शेख (वय ३०, रा. कोंढवा, पुणे) हे दोघे एम.एस.ई.बी. ऑफिस समोर, रास्ता पेठ, पुणे येथे थांबले असलेबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांना सदर बातमीचा आशय सांगून वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस नाईक ताजणे व पोलीस शिपाई ताकपेरे यांना आरोपी मिळताच समक्ष हजर करणेबाबत आदेशित केले होते.

प्राप्त बातमीचे अनुषंगाने वरील दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सदर ठिकाणी मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेऊन दोन्ही आरोपींना पुढील कार्यवाहीकरीता फरासखाना पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, प्रभारी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) भाग्यश्री नवटक्के, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे २) लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखालील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -१, गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, सहायक पोलीस फौजदार शाहिद शेख, पोलीस नाईक धनंजय ताजणे, मॅगी जाधव, गणेश ढगे आणि पोलीस अंमलदार सुमीत ताकपेरे दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.

get_footer();