आवृत्ती पुणे
← Back to Homepage

व्हॉट्सॲपवर अश्लील फोटो पाठवून महिलेचा विनयभंग

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 9, 2022
Spread the love

सांगवी पोलिसांत फिर्याद : सहा मोबाईलधारकावर गुन्हा

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : शेअरचॅट या ॲपवर महिलेचा मोबाईल नंबर शेअर झाल्यानंतर महिलेला तिच्या व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज आणि फोटो पाठवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 11 फेब्रुवारी 2022 ते 7 एप्रिल 2022 या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी 6 मोबाइल धारकांवर गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिला या शेअरचॅट हे ॲप्लिकेशन वापरत होत्या. यातून त्यांना आर्थिक उत्पन्न मिळत होते. तसेच ॲपमधील चॅटरुम या ऑप्शनवरुन फिर्यादी यांची लोकांसोबत ओळख झाली. यानंतर फिर्यादी यांना व्हॉट्सॲपवर वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरुन अश्लील मसेज व फोटो एडिट करुन सोशल मीडियावर शेअर केले. याबाबत संबंधित मोबाईल धारकांकडे विचारणा केली असता आरोपींनी फिर्यादी यांना धमकी दिली. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

get_footer();