आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पत्नी व सासूच्या त्रासाला कंटाळून बिल्डरची आत्महत्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 15, 2021
Spread the love

लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : आत्महत्येपूर्वी बनवला व्हिडीओ

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

लग्न झाल्यापासून वेगळे राहण्यासाठी आणि बाहेर नोकरी करावयाची या कारणावरुन पत्नी आणि सासुच्या त्रासाला कंटाळून बाधकाम व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने मोबाईलवर व्हीडिओ रेकॉर्ड केला असून, त्यामध्ये मी माझे जीवाचे बरे वाईट करीत असून त्यास जबाबदार माझी पत्नी व सासु आहे असे त्यात म्हटले आहे.

रोहित सुनील पवार (रा. माई हाईटस, कदमवाकवस्ती, लोणी स्टेशन) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना 10 ऑगस्ट 2021 रोजी घडली होती. याप्रकरणी सुनिल रघुनाथ पवार (58 , रा. माई हाईटस, लोणी स्टेशन) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन रोहित पवार याची पत्नी रश्‍मी रोहित पवार (26 ) आणि सासु लता राजेश चव्हाण (46 , दोघी रा. रामटेकडी, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, रोहित पवार याचा विवाह २०१७ मध्ये रश्‍मी बरोबर झाला होता. त्यांना एक छोटा मुलगाही आहे. त्याचा छोटा कंन्स्ट्रक्‍शनचा व्यवसाय होता. मागील काही महिन्यापासून त्याला काम मिळत नव्हते. यामुळे त्याने पत्नीमार्फत सासूकडून घरखर्चासाठी पैसे घेतले होते. यातूनच पती-पत्नीमध्ये वाद होत असल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आली आहे. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

get_footer();