आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पत्नी आणि सासरच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 22, 2022
Spread the love

लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : खेडेकरमळा उरुळी कांचन येथे घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहिता आत्महत्या करीत होती. मात्र, आता पत्नी आणि सासरच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचा अजब प्रकार उघडकीस आला. खेडेकरमळा (उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) येथे २४ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ दरम्यान पॅराक्वीट औषध पिवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा हा प्रकार घडला.

राहुल विलास खेडेकर (वय ३२, रा. खेडेकर माळा, उरुळी कांचन, ता. हवेली), जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे वडिल विलास खेडेकर यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार पत्नी, पत्नीची आई, भाऊ, बहीण, पत्नीच्या शेजारी राहणारी व्यक्ती (सर्व रा. वानवडी, शांतीनगर, ता. हवेली, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचा मुलगा राहुल याने पत्नी आणि सासरच्या छळाला कंटाळून पॅराक्वीट तननाशक औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार केले. मात्र, पुन्हा दुसऱ्या दिवशी घरी आणल्यानंतर औषध प्राशन केले. त्यावेळी वायसीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();