आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पत्नीसोबत वाद झाल्याने तरुणाने केली आत्महत्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 23, 2021
Spread the love

खेड तालुक्यातील घटना : झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : तरुणाने पत्नीसोबत झालेल्या वादानंतर भयावह पद्धतीने आपलं आयुष्य संपवलं आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील खेड तालुक्यात घडली आहे. खेड घाटात संबंधित तरुणाचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. या भयावह घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उ़डाली आहे.

जयदीप काळूराम जैद (वय, 40) असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, जयदीप जैद हा खेड तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी त्याचा आपल्या पत्नीसोबत भांडण झालं होतं. वाद झाल्यानंतर, जयदीप रागाच्या भरात घराबाहेर पडले होते. यानंतर खेड घाट परिसरातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला आहे.

त्यामुळे पत्नीसोबत झालेला वाद जिव्हारी लागल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी, असा एक प्राथमिक संशय पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, येथील काही स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर, खेड पोलीस घटनास्थळी धाव घेतली.
संबंधित तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त केला आहे.

दरम्यान, घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

get_footer();