आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पत्नीला त्रास देणाऱ्या डॉक्‍टरला न्यायालयाचा ‘दणका’

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 14, 2021
Spread the love

डॉक्टर पत्नीला मिळाला दिलासा : प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदमाकर जोंधळे यांनी दिला आदेश

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : डॉक्‍टरांकडे समाजातील आदर्श म्हणून पाहिले जाते. मात्र, मुलगी झाली म्हणून डॉक्‍टर पत्नीला त्रास देणाऱ्या डॉक्‍टरला न्यायालयाने दणका दिला आहे. तिला आणि मुलीला मिळून दरमहा पंधरा हजार रुपये अंतरिम पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. तसेच तिच्यावर घरगुती हिंसाचाराचे प्रकार करण्यापासून पती व त्याचे नातेवाईकांना प्रतिबंध करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदमाकर जोंधळे यांनी हा आदेश दिला आहे.

माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) दोघेही डॉक्‍टर आहेत. त्यांचा विवाह 15 फेब्रुवारी 2012 मध्ये झाला. चार वर्षांनी त्यांना मुलगी झाली. परंतु मुलगी झाल्याचा राग आणि अधिक पैशाच्या हव्यासापोटी त्याने पत्नीवर अत्याचार करण्यास सुरूवात केली. हा त्रास तिला इतका असह्य झाला की, तिला यासाठी न्यायालयाची पायरी चढावी लागली.

तिने ॲड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला. त्यानंतर अंतरिम पोटगीचा आदेश देण्यात आला आहे. तसेच, पत्नी ही कमावणारी स्त्री असली तरी तिला वागविण्याची व त्याच्या राहणीमानाप्रमाणे तिला पोटगी देण्याची जबाबदारी ही पतीवर असते, असे ही न्यायालयाने आदेशात नमूद केलेले आहे. या आदेशामुळे डॉक्‍टर पत्नीला तर दिलासा मिळालाच आहे. पण, समाजातही चांगला संदेश जाईल, असे अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी म्हटले आहे.

get_footer();