आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गांजा विक्री करणाऱ्या महिलेला मुंढवा पोलिसांकडून अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • May 31, 2023
Spread the love

500 ग्रॅम गांजासह महिला ताब्यात

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : येथील मुंढवा परिसरातल्या केशवनगर, गायरान वस्ती इथे अवैध गांजाविक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी घातलेल्या छाप्यात सुभद्रा माचरे, वय वर्षे 56, राहाणार गायरानवस्ती, केशवनगर मुंढवा हिला अटक केली.

अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेला अंदाजे 10 हजार रूपये किंमतीचा 500 ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा बिया बोंडांसह गांजा जप्त करण्यात आला आहे.
सध्या पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार, परिमंडळ 5 चे पोलिस उप आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशावरून अवैध धंद्यांवर कारवाई केली जाते आहे. सदर कारवाई परिमंडळ 5 चे पोलिस उप आयुक्त विक्रांत देशमुख, हडपसर विभाग सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे, पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे यांच्या सुचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक संदीप जोरे, पोलिस हवालदार दिनेश भांदुर्गे, पोलिस हवालदार वैभव मोरे, पोलिस हवालदार महेश पाठक, पोलिस हवालदार हेमलता गावडे, पोलिस शिपाई पुनम टिळेकर यांनी ही कारवाई यशस्वी केली.

get_footer();