आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महिलांकडील साडेतीन लाख रुपयांच्या दागिन्यावर डल्ला

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 18, 2021
Spread the love

पोलिसांपुढे चोरट्यांचे आव्हान : शहरात सोनसाखळी चोरीच्या तीन घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला. वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी महिलांकडील तीन लाख ६० हजारांचे दागिने हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या. कर्वेगर, सिंहगड रस्ता, कोंढवा, हडपसर परिसरात महिलांकडील दागिने हिसकावून नेले. भुरट्या चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केल्याचे चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथील पुलाखालून सकाळी पावणेनऊच्या सुमारास दुचाकीस्वार महिला निघाली होती. महिलेबरोबर तिची मुलगी होती. सकाळी पावणेनऊच्या सुमारास दुचाकीस्वार चोरट्यांनी दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील ४५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. याबाबत महिलेने सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

कोंढव्यातील मधुबन सोसायटीत एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक लाख ३५ हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बर्गे तपास करत आहे

हडपसरमधील फुरसुंगी परिसरात पादचारी महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. महिलेने याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला हडपसरमधील तुकाई दर्शन रस्त्यावरून पतीबरोबर निघाली होती. त्या वेळी दुचाकीवरील चोरट्यांनी तिच्या गळ्यातील एक लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुंमत गायकवाड तपास करत आहेत.

कर्वेनगरमधील काकडे सिटी परिसरात एका महिलेच्या गळ्यातील ८० हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. वारजे पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक मुंढे तपास करत आहेत.

get_footer();