आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अल्पवयीन दुचाकीचालकाचा लिंबाच्या झाडाला धडकून मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 12, 2022
Spread the love

मुंढवा पोलिसांत फिर्याद : केशवनगर-मुंढव्यातील रस्त्यावर झाला अपघात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क

पुणे : भरधाव वेगातील अल्पवयीन दुचाकीचालकाचा लिंबाच्या झाडाला धडकून मृत्यू झाला. त्याच्या पाठीमागे बसलेला मुलगा किरकोळ जखमी झाला. केशवनगर-मुंढवा कल्याणी बंगला रस्त्यावर १० मार्च २०२२ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.

मुंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार सीताराम देशमुख यांनी मुंढवा पोलिसांत फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, केशवनगर-मुंढवा येथील निवास इलेव्हिया बांधकामाच्या वळणावर कल्याणी बंगला रोड येथे अल्पवयीन मुलगा दुचाकीवर भरधाव वेगात जात होता. त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने लिंबाच्या झाडाला धडकून अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालक अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. दुचाकीच्या पाठीमागे बसलेला मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. मुंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी काटे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();