आवृत्ती पुणे
← Back to Homepage

युवकाची शर्टच्या सहाय्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 20, 2021
Spread the love

तळेगाव दाभाडेमध्ये प्रचंड खळबळ : मृत व्यक्तीच्या दंडावर हनुमानाचे चित्र

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : एका अनोळखी युवकाने शर्टच्या सहाय्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तळेगाव दाभाडे (जि. पुणे) येथे उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.19) दुपारी साडेबाराच्या सुमारास तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हिंदमाता भुयारी मार्गाजवळील ऑक्सिजन पार्क येथे घडली आहे. पोलिसांकडून या युवाकाची ओळख पटविण्याचे काम चालू आहे.

याप्रकरणी राजेंद्र गणेशराम प्रसाद (वय-35 रा. लिट्ल हार्ट, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. मृत व्यक्तीचे अंदाजे वय 25 ते 30 असून उंची 5 फूट 7 इंच आहे. पायात निळा पांढरा बूट असून अंगावर निळ्या रंगाची जीन्स पँट आहे.

त्याच्याजवळ 19 तारखेचे तळेगाव रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मचे तिकीट आढळून आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर झोल यांनी दिली. मृत व्यक्तीच्या उजव्या दंडावर हनुमानाचे चित्र असून कोपरा जवळ नक्षी गोंदलेली आहे. तर उजव्या हाताच्या पंजावर जय सेवालाल असे गोंदलेले आहे. मृतदेहाची ओखळ पटवण्याचे काम सुरु आहे. या संदर्भात कोणाला काही माहिती असेल तर त्यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

get_footer();