आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आयएमसी सदस्य व भाजप नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

भुम : आचार्य विद्यासागर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुम येथे आयएमसी सदस्य व भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी संस्था व आयएमसीच्या कार्यपद्धतीबाबत माहितीपर बैठकही घेण्यात आली.

भुम येथील आचार्य विद्यासागर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयएमसी सदस्य आणि भाजपा परांडा विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.

या बैठकीत संस्थेचे प्राचार्य हर्षद राजूरकर यांनी आयएमसी संकल्पना, कार्यपद्धती व उद्दिष्टे यांची माहिती दिली. यावेळी नविन आयएमसी सदस्य प्रदीप साठे, सचिन क्षीरसागर व नागेश डोंगरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त भूम तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर आणि शहर मंडळ अध्यक्ष बाबासाहेब वीर यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील, सिद्धार्थ जाधव, तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

get_footer();