आवृत्ती पुणे
← Back to Homepage

२४६ नगरपरिषद, ४२ नगर पंचायतीसाठी २ डिसेंबरला मतदान

पुणे : राज्य निवडणूक आयोगाने आज नगरपरिषद व नगरपंचायतींसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना लागली होती, तो कार्यक्रम अखेर आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला.आज झालेल्या पत्रकार परिषदेत आयोगाकडून या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

पहिल्या टप्प्यात राज्यभरातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद व महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींमध्ये २ डिसेंबर रोजी एकाच दिवशी मतदान होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार आहे. त्यात सर्वाधिक ६० नगरपरिषद पुणे जिल्ह्यात आहेत. नाशिक विभागात ५९, नागपूरमध्ये ५५, तर कोकण विभागात २७ नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.

१३,३५५ मतदान केंद्रांवर मतदान होईल. २८८ अध्यक्ष, ३,८२९ प्रभाग, आणि ५,८५९ सदस्य पदांसाठी ही निवडणूक होणार आहे. मतदारनिहाय याद्या ७ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केल्या जातील. या निवडणुकांमध्ये एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार असणार आहेत.

संस्थेचा प्रकारअध्यक्षपदासाठी मर्यादासदस्यपदासाठी मर्यादा
अ वर्ग नगरपरिषद₹15 लाख₹5 लाख
ब वर्ग नगरपरिषद₹11.25 लाख₹3.50 लाख
क वर्ग नगरपरिषद₹7.50 लाख₹2.50 लाख
नगरपंचायत₹6 लाख₹2.25 लाख
get_footer();