आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत जैन समाजाचे उमेदवार केंद्रस्थानी

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून, यंदाच्या निवडणुकीत जैन समाजाचे उमेदवार अनेक प्रभागांतून रिंगणात उतरले आहेत. प्रमुख राजकीय पक्षांनी जैन समाजातील नेतृत्वावर विश्वास दाखवत उमेदवारी दिल्याने शहराच्या राजकारणात जैन समाज पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. पुणे शहरात सुमारे एक लाखांच्या आसपास जैन मतदारसंख्या असल्याने या उमेदवारांचे यश-अपयश महापालिकेतील सत्तासमीकरणावर प्रभाव टाकणारे ठरणार आहे.

get_footer();