आवृत्ती पुणे
← Back to Homepage

फोनवर डॉक्टरची अपॉईमेंट घेत आहात, सावधान

Spread the love

पुणे : सायनसच्या त्रासासाठी डॉक्टरांची ऑनलाईन अपॉइंटमेंट घेताना एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ५ लाख ५४ हजार ६१० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत लॉ कॉलेज रोड परिसरात राहणाऱ्या ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांनी डेक्कन पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार १४ मार्च ते २९ मार्च २०२६ दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना सायनसचा त्रास होत असल्याने त्यांनी मोबाईलवर इंटरनेटद्वारे कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉक्टरांचा शोध घेतला.

त्यावेळी ‘डॉ. घैसास’ नावाने एक मोबाईल क्रमांक उपलब्ध झाला. त्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःला रुग्णालयातून बोलत असल्याचे सांगितले. अपॉइंटमेंट निश्चित करण्यासाठी केवळ ५ रुपये Google Pay द्वारे पाठवण्यास सांगण्यात आले आणि त्यासाठी एक लिंक पाठवण्यात आली. त्या लिंकवर क्लिक करून रुग्णाची माहिती भरण्यास सांगण्यात आले.

फिर्यादींनी ५ रुपये पाठविल्यानंतर त्यांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ कॉल बंद केला. मात्र, तोपर्यंत सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या मोबाईलचा अॅक्सेस मिळवला होता. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून १८ मार्च रोजी तीन ते चार व्यवहार करण्यात आले. पुढे २८ आणि २९ मार्च रोजीही व्यवहार करून एकूण ५ लाख ५४ हजार ६१० रुपये काढून घेतले.

ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर ही तक्रार डेक्कन पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर करत आहेत.

← Back to Homepage

फोनवर डॉक्टरची अपॉईमेंट घेत आहात, सावधान

Spread the love

पुणे : सायनसच्या त्रासासाठी डॉक्टरांची ऑनलाईन अपॉइंटमेंट घेताना एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ५ लाख ५४ हजार ६१० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत लॉ कॉलेज रोड परिसरात राहणाऱ्या ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांनी डेक्कन पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार १४ मार्च ते २९ मार्च २०२६ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना सायनसचा त्रास होत असल्याने त्यांनी मोबाईलवर इंटरनेटद्वारे कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉक्टरांचा शोध घेतला. त्यावेळी ‘डॉ. घैसास’ नावाने एक मोबाईल क्रमांक उपलब्ध झाला. त्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःला रुग्णालयातून बोलत असल्याचे सांगितले.

अपॉइंटमेंट निश्चित करण्यासाठी केवळ ५ रुपये Google Pay द्वारे पाठवण्यास सांगण्यात आले आणि त्यासाठी एक लिंक पाठवण्यात आली. त्या लिंकवर क्लिक करून रुग्णाची माहिती भरण्यास सांगण्यात आले.

get_footer();