आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रमजान महिन्यात चिमुकल्यांचा पहिला रोजा सोडण्याचा सोहळा उत्साहात संपन्न

भुम : पवित्र रमजान महिन्यानिमित्त भुम येथे चिमुकल्यांचा रोजा सोडण्याचा सोहळा उत्साहात पार पडला. भुमचे माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांच्या हस्ते जमीरभाई शेख यांची नात आदिबा समीर शेख आणि नातू हसनेन समीर शेख या दोन्ही चिमुकल्यांचा धरण्यात आलेला रोजा सोडण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक किरण जाधव, ॲड. पंडित ढगे, जुनेद मोमीन, समीरभाई शेख, मुशीरभाई शेख यांच्यासह मित्रपरिवार व अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात रमजान महिन्याच्या पवित्रतेचा संदेश देत सर्वांनी चिमुकल्यांना शुभेच्छा दिल्या.

get_footer();