आवृत्ती पुणे
← Back to Homepage

राष्ट्रीय पातळीवर बार्शीचा झेंडा रोवला

बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : गोवा राज्य म्युझिकल चेअर व स्केटिंग असोसिएशनच्या वतीने पणजी येथे आयोजित १६ वी राष्ट्रीय म्युझिकल चेअर व स्केटिंग चॅम्पियनशिप २०२५ या स्पर्धेत बार्शीच्या खेळाडूंनी म्युझिकल चेअर स्केटिंग, म्युझिकल चेअर, फ्री स्टाईल व स्पीड रेसिंग या चारही प्रकारांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले. त्यांनी एकूण ४७ पदकांची कमाई करत महाराष्ट्रासाठी प्रथम क्रमांकाची राज्य ट्रॉफी पटकावली.

या खेळाडूंना श्रीशा स्केटिंग क्लब, बार्शीच्या प्रियंका येडलवार यांचे मार्गदर्शन लाभले. देशभरातून सुमारे ४५० स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. या खेळाडूंनी केवळ वैयक्तिक यशच मिळवले नाही, तर संघ म्हणून महाराष्ट्राला देशपातळीवर सर्वोच्च स्थान मिळवून दिले आहे.

या यशाबद्दल संपूर्ण बार्शी शहरातून तसेच महाराष्ट्रभरातून या खेळाडूंचे कौतुक व अभिनंदन होत आहे. म्युझिकल चेअर स्केटिंग ही पारंपरिक म्युझिकल चेअर खेळाची एक कलात्मक व खेळती आवृत्ती आहे, जी स्केटिंगच्या माध्यमातून खेळली जाते.

या स्पर्धेत खेळाडूंना संगीताच्या तालावर स्केट करताना तंत्र, गती आणि जागरूकता या तिन्ही गुणांची कसोटी द्यावी लागते. ही स्पर्धा केवळ शारीरिक क्षमतेचीच नव्हे, तर मानसिक एकाग्रतेचीही परीक्षा असते असे प्रियंका येडलवार यांनी सांगितले.

get_footer();