आवृत्ती पुणे
← Back to Homepage

संयोगिता गाढवे यांची नगराध्यक्षपदी निवड : मंत्रालयात सन्मान सोहळा

भूम : भूम नगरपरिषदेच्या निवडणुकीत आलमप्रभू भूम शहर विकास आघाडीच्या उमेदवार संयोगिता गाढवे यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला असून, या यशाबद्दल मंत्रालयात विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

भूम नगरपरिषदेच्या निवडणुकीत राज्याचे माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व संजय गाढवे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या निवडणुकीत आलमप्रभू भूम शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संयोगिता गाढवे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली.

या निवडीबद्दल धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री मा. ना. प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मंत्रालय, मुंबई येथे मा. नगराध्यक्ष संजय गाढवे व परांडा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

या सन्मान सोहळ्याला शिवसेनेचे धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हा प्रमुख दत्ता साळुंखे, जांब येथील सरपंच समाधान भोरे, माजी नगरसेवक किरण जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

get_footer();