आवृत्ती पुणे

युगदर्शक आयकॉन पुरस्कार जाहिर

17 फेब्रुवारी 2024 रोजी होणार वितरण महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : युगदर्शक प्रतिष्ठानने समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत असताना सामाजिक बांधीलकीही जपली आहे. गेली दहा वर्षापासून युगदर्शक प्रतिष्ठानने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींना युगदर्शक बार्शी आयकॉन व इतर पुरस्कार देऊन गौरविण्याची परंपरा चालू केली आहे. याहीवर्षी आम्ही ही परंपरा कायम … Read more

सोलापूरच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी मोनिका ठाकूर यांची नियुक्ती

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : सोलापूर अप्पर जिल्हाधिकारीपदी मोनिका सुरजपालसिंह ठाकूर यांची नियुक्ती झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांची बदली नागपूर जिल्हाधिकारीपदी झाल्यामुळे हे पद रिक्त होते. मागील काही दिवसांपासून अप्पर जिल्हाधिकारी पदी महिला अधिकारी येणार अशी चर्चा चालू होती. आता शेवटी त्यांच्या रिक्त जागेवर पुणे महानगरपालिका … Read more

दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : सुलाखे माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल मध्ये ८ फेब्रुवारी रोजी १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक स्वामीराव हिरोळीकर होते. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.ज्या शाळेने आपल्याला अंगाखांद्यावर खेळवले, संस्कार दिले ती शाळा सोडून जायची या विचारानेच विद्यार्थी भावूक … Read more

बार्शीत विधवा महिलांसाठी हळदी – कुंकूंचा कार्यक्रम

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : स्त्रियांनी स्वतःचं आयुष्य स्त्री म्हणून जगलं पाहिजे, समाजात वावरलं पाहिजे, यासाठी मकर संक्रांतीच्या सणाला सकाळ तनिष्का प्रतिष्ठानने विधवा स्त्रियांसाठी हळदी-कुंकूंचा उपक्रम राबविला. मकर संक्रांतीच्या सणाला स्त्रियांसाठी हळदी कुंकूंचा कार्यक्रम आयोजित केला जातो. मात्र, स्त्रियांसाठीच्या या कार्यक्रमात ‘विधवा’ स्त्रियांना टाळले जाते. सुवासिनी म्हणून ज्या स्त्रियांना मानले जाते. त्याच … Read more

कॅन्सर हॉस्पिटल ही बार्शीची अस्मिता : दिलीप सोपल

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रमाळ बार्शी : अगदी उद्योगपती रतन टाटा, अभिनेते सुनील दत्त, शरद पवार पासून ते बार्शीतील दातृत्वशील व्यक्ती संस्था यांच्या योगदानातून उभारलेले कॅन्सर हॉस्पिटल ही बार्शीची अस्मिता आहे असे प्रतिपादन माजी मंत्री दिलीप सोपल यांनी केले. ते कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या डेक्सा स्कॅनिंग मशीन व भारतीय आरोग्य जीवन शैली आणि … Read more

गोविंददेव गिरी महाराज यांना सूर्यरत्न – द सेंट ऑफ मॉडर्न इंडिया पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांना ‘सूर्यदत्त सूर्यरत्न राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार – द मॉडर्न सेंट ऑफ इंडिया’ देऊन शनिवार दि. १० फेब्रुवारी रोजी सन्मानित करण्यात आले. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या २६ व्या वर्धानपनदिनानिमित्त ‘सूर्यदत्त’तर्फे हा पुरस्कार देण्यात … Read more

मुलांच्या विकासाला पालकांचे पाठबळ गरजेचे : मकरंद टिल्लू

कथाकथनकार मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पराग पोतदार पुणे : लहान मुलांमधील गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी पालकांच्या आत्मविश्वासाचे पाठबळ गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू यांनी केले.  शब्दसारथीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘ऐक, एक गोष्ट सांगतो’ या राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत विजेते ठरलेल्या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी … Read more

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती सुभाष हस्तीमल लोढा व युवा उद्योगपती विक्रम लोढा यांनी योग गुरु बाबा रामदेव यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अनेक विषयावर योग गुरु व सुभाष लोढा यांची चर्चा झाली. सुभाष लोढा करीत असलेल्या “गोसेवेच्या” कार्याचे बाबा रामदेव यांनी कौतुक केले.

करमाळ्याच्या सौंदर्यासाठी १०० कोटीपेक्षा अधिक निधी – आ. संजय शिंदे

करमाळा भुईकोट किल्ल्यासाठी ॲक्शन मोडवर.. महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापुर (करमाळा): करमाळा शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासाठी आपण १०० कोटीपेक्षा अधिक निधी दिला असल्याची माहिती करमाळा मतदार संघाचे आमदार संजय शिंदे यांनी दिली. राज्य शासनाच्या पुरातत्त्व व संग्रहालय विभागाअंतर्गत करमाळ्यातील ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन व जतन करण्यात येणार असून या कामासाठी २ कोटी निधी मंजूर … Read more

प्रकाश धारीवाल यांची फेक प्रोफाइल बनवून फसवणूकीचा प्रयत्न

पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल यांची फेक प्रोफाइल बनवून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट सिम कार्ड वापरून फसवणूकीचा प्रयत्न झाला असून या प्रकरणी प्रकाश धारीवाल यांनी पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. यावेळी बोलताना प्रकाश धारिवाल यांनी सांगितले … Read more