आवृत्ती पुणे

रमाई आंबेडकर यांना अभिवादन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : तानाजीराव सावंत युवा मंच च्या वतीने माता रमाई यांना अभिवादन करण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीचे औचित्य साधत जिल्हा परिषद हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. युवा मंच चे अध्यक्ष प्रा.डॉ.तानाजीराव सावंत व युवासेना शहर प्रमुख … Read more

महाराष्ट्र विद्यालयाचे NNMS परीक्षेमध्ये घवघवीत यश

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत २४ डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एन.एम.एम.एस) शिष्यवृत्ती. परीक्षेत महाराष्ट्र विद्यालयातील एकूण १५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकाच शाळेतील एवढया जास्त प्रमाणात उत्तीर्ण झालेली बार्शी तालुक्यातील ही पहिली शाळा आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सचिन देशमुख, सुरेश डिसले, संग्राम … Read more

शेतकऱ्यांसाठी मोफत डीपी वाहतूक सुविधा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : डॉ. राहुल घुले यांच्या फाऊंडेशनतर्फे शेतकरी बांधवांच्या अडचणी लक्षात घेता मोफत शेतीच्या बांधावरून ते एमएसईबी कार्यालयापर्यंत मोफत डीपी वाहतूकीची व्यवस्था करण्यात आली आहे. डीपी दुरुस्त झाल्यावर एमएसईबी कार्यालय ते शेतीच्या बांध्यापर्यंत परत वाहतुकीसाठी मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत 55 पेक्षा अधिक डीपी उचलण्यात आले आहेत. सोनारी … Read more

रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : तालुक्यात विविध ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली. भूम येथील भीमनगर, रमाई नगर येथे माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली. रमाई नगर येथे महिलांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी लक्ष्मी कांबळे, कौशल्या बनसोडे, शांता सोनवणे, कावेरा टेकाळे, माजी नगरसेवक … Read more

ग्रामसभेत ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा ठराव

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : बार्शी तालुक्यातील घारी येथे ग्रामसभेत राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यासाठी एक मताने ठराव घेण्यात आला आहे. शनिवार, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी घारी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच छाया काशिद यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा संपन्न झाली. या ग्रामसभेमध्ये राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत … Read more

रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बालआनंद मेळाव्याचे आयोजन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : भूम शहरातील श्री गुरुदेव दत्त प्राथमिक विद्यामंदिरमध्ये रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बालआनंद मेळाव्याचे उदघाटन सतिश देशमुख यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थिती गुरुदेव हायस्कूलचे मुख्याध्यापक दत्ता भालेराव यांनी दर्शविली. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक अंजना मुंढे यांनी केले. यावेळी रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन … Read more

टोळीप्रमुख रब्बील शेख आणि साथीदारावर मोक्का

खडकी पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: टोळीप्रमुख रब्बील शेख व त्याच्या साथीदाराविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.खडकी पोलीसांनी ही कामगिरी केली. रब्बील शेख, (वय ३२ वर्षे, रा. मेफेर एलिंगझा, कोंढवा), मुस्तफा खान, (वय १९ वर्षे, रा. रॉयल हाईट्स, बोपोडी) यांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. फिर्यादी हे खडकी बाजार येथील … Read more

जबरी चोरी करणारा आरोपी २४ तासात जेरबंद

शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजीत डुंगरवाल पुणे: जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपीस २४ तासात जेरबंद करण्यास शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. पियुष मरोठे, (वय-२२, रा. वानवडी गांव) प्रणय लोंढे, (वय-१८, रा. तानाजीनगर चिंचवड व वानवडी), व दोन विधीसंघर्षीत बालके ताब्यात घेण्यात आली. त्यांच्याकडुन चोरी केलेला मोबाईल फोन, सोन्याची चेन तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन … Read more

पोलीस भरतीसाठी बनवायचा बनावट सर्टिफिकेट

आरोपीस ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : लोहमार्ग पोलीस भरतीसाठी बनावट सर्टिफिकेट देणाऱ्या आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, यांनी शिक्षा सुनावली आहे. ही कामगिरी खडकी पोलीसांनी केली आहे. आरोपी सागर राठोड, (वय ३१ वर्षे, रा. जयसिंगपुर, ता. शिरोळ, जि. कोल्हापुर) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याला ३ वर्षे सश्रम कारावास … Read more

बेकायदेशीरपणे गांजाविक्री करणाऱ्याला पकडले

11 लाख 47 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : मौजे तांदुळवाडी येथे अंमली पदार्थ गांजा बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या आरोपीला पकडण्यात यश आले आहे. सोलापूर पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. आकाश सोनकडे,(वय 22 रा. सिद्धेश्वर साखर कारखान्या च्या पाठीमागे सोणकडे वस्ती होटगी दक्षिण सोलापूर), आकाश काळे (रा.सिद्धेश्वर साखर कारखाना … Read more