Maharashtra News Networks
धडक लागल्याचा बहाणा करून चोरी करणाऱ्या ‘टक टक’ गँगचा पर्दाफाश
कारचालकांना लक्ष्य करून चोरी करणारे दोन परप्रांतीय चोरटे जेरबंद, तीन गुन्हे उघडकीस महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गर्दीच्या ठिकाणी तसेच उभ्या असलेल्या कारचालकांना लक्ष्य करून तुमच्यामुळे नुकसान झाल्याचा बहाणा करून त्यांच्या गाडीतील मोबाईल व मौल्यवान वस्तू चोरून नेणाऱ्या ‘टक टक’ गँगच्या दोघा परप्रांतीय चोरट्यांना गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने पकडले. त्यांनी फरासखाना, अलंकार व … Read more
लष्करातील कुक पदासाठीच्या लेखी परीक्षेतील डमी उमेदवारांवर गुन्हा दाखल
धानोरीतील ग्रेफ सेंटरमधील घटना : लागोपाठ दोन दिवस एकच उमेदवार दोघांच्या नावाने देत होता परीक्षा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : लष्करातील कुक पदासाठीच्या लेखी परीक्षेत तोतयागिरी करून डमी उमेदवार म्हणून परीक्षा देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या जनरल रिझर्व्ह इंजिनिअरिंग फोर्सचे कमलू उमाकांत नारायणासा यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात … Read more
रमजान महिन्यात चिमुकल्यांचा पहिला रोजा सोडण्याचा सोहळा उत्साहात संपन्न
महाराष्ट्र न्युज नेटवर्क भुम : पवित्र रमजान महिन्यानिमित्त भुम येथे चिमुकल्यांचा रोजा सोडण्याचा सोहळा उत्साहात पार पडला. भुमचे माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांच्या हस्ते जमीरभाई शेख यांची नात आदिबा समीर शेख आणि नातू हसनेन समीर शेख या दोन्ही चिमुकल्यांचा धरण्यात आलेला रोजा सोडण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक किरण जाधव, ॲड. पंडित ढगे, जुनेद मोमीन, … Read more
टिपू पठाण टोळीवर तिसरी मोक्का कारवाई
टिपू पठाणच्या फरार साथीदाराला काळेपडळ पोलिसांनी केले जेरबंद महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हॉटेल मालकाला धमकावून मी सांगेल त्या दुकानातून खरेदी करायला भाग पाडून दरमहा ५ हजार रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी टिपू पठाण व त्याच्या टोळीवर तिसऱ्यांदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. काळेपडळ पोलिसांनी टिपू पठाणच्या फरार असलेल्या साथीदाराला जेरबंद केले. फैजान ऊर्फ पच्चीस रमजान … Read more
टिपू पठाण टोळीवर तिसरी मोक्का कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
नवले पुल परिसरात भरधाव ट्रकची ६ वाहनांना धडक
कात्रजहून आलेल्या ट्रकचे नियंत्रण सुटले : सिग्नलला थांबलेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यु महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बंगळुरू–मुंबई बाह्यवळण महामार्गावर नवले पुल परिसरात भरधाव ट्रकने सिग्नलला थांबलेल्या सहा वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. या भीषण अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मृत दुचाकीस्वाराचे नाव आशफाक हनीफ चौधरी (वय ३५, रा. अश्रफनगर, कोंढवा) असे आहे. याप्रकरणी त्यांचे … Read more
लाकडी बॅटने मारहाण करून तरुणाचा केला खून
धायरीतील घटना : प्रेमसंबंधाबाबत जाब विचारल्याचे कारण, संशयित आरोपी फरार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रेमसंबंधाबाबत जाब विचारून पुन्हा अल्पवयीन मुलीला त्रास देऊ नको, असे सांगितल्याच्या कारणावरून तरुणाला लाकडी बॅटने मारहाण करून त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयित आरोपी फरार झाला आहे. विशाल प्रशांत हबीब (वय २८, रा. राधिका रॉयल सोसायटी, बारंगणीमळा, धायरी) … Read more
१८ वर्षांच्या युवकाने राज्य शिक्षण बोर्डासह अनेकांना फसवले
टेलिग्राम चॅनेलच्या फिचरचा गैरफायदा घेऊन पेपर फोडल्याचे भासवले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : टेलिग्राम चॅनेलवरील ‘रिप्लेस’ या फिचरचा गैरफायदा घेऊन एका १८ वर्षांच्या युवकाने राज्य माध्यमिक शिक्षण मंडळासह अनेकांना गंडवले. पोलिसांच्या तपासात या युवकाने टेलिग्राम चॅनेलच्या फिचरचा गैरफायदा घेऊन अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रत्यक्षात या टेलिग्राम चॅनेलवर पेपर फुटल्याचे दिसत असले, … Read more