आवृत्ती पुणे

बार्शी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी बालाजी कुकडे

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची बदली झाल्यानंतर, बार्शी शहर पोलीस ठाणे या ठिकाणी पोलीस निरीक्षक पदी कोणाची नियुक्ती होणार याबाबत बार्शी शहरांमध्ये उत्सुकता होती.मात्र आता बार्शी शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षकपदी बालाजी कुकडे यांची नियुक्ती झाली आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या आदेशानुसार, सुरक्षा … Read more

बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडी परिसरात एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिबवेवाडी पोलिसांनी मुलावर सुधारित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.1) रात्री आठच्या सुमारास पिडीत मुलीच्या राहत्या घराजवळ घडला आहे.याबाबत 14 वर्षाच्या पिडीत मुलीने मंगळवारी (दि.2) बिबवेवाडी पोलीस ठाण्यात … Read more

हाइड पार्क सोसायटी में योग दिन पर विशेष योगासन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : हाइड पार्क सोसाइटी के “ओल्ड इज गोल्ड” ग्रुप के सदस्यो की ओर से योग दिवस पर विशेष योगासन किए गए। यह ग्रुप रोज सुबह 5.30 बजे योग प्राणायाम नरेंद्र लोढ़ा इनके मार्गदर्शन पर करते है। इस समय सतीश शहा इनके साथ ग्रुप के सभी सदस्य उपस्थित थे।

पार्सल मध्ये ड्रग मिळाल्याचे सांगून ३२ लाख उकळले

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तुम्ही इराणला पाठवलेल्या पार्सल मध्ये ड्रग मिळाले आहेत, त्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल अशी भीती दाखवूनएका अनोळखी व्यक्तीने कोंढव्यातील युवकाकडून तब्बल ३२ लाख रुपये उकळल्याची घटना एनआयबीएम महमदवाडी, येथे घडली आहे. ५ जुन रोजी ही घटना घडली आहे. फिर्यादीने पाठवलेल्या पार्सल मध्ये ड्रग मिळाले आहेत. त्याबाबत मुंबई नार्कोटिक्स येथे … Read more

टास्कच्या बहाण्याने महिलेस सोळा लाखास फसवले

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वेगवेगळ्या कंपन्यांचे व्हिडीओ लाईक केल्यास कंपनीकडून त्याबदल्यात पैसे मिळतील असे सांगून, एक लिंक देऊन ग्रुप जॉईन करून घेवून वेगवेगळे टास्क देवून महिलेची सोळा लाख रुपयांची फसवणुक करण्याचा प्रकार महमदवाडी उंड्री परिसरात घडला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेस अनोळखी … Read more

स्टॉक मार्केटमध्ये नफ्याच्या आमिषाने फसवणूक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे आमिष दाखवून कोथरूड मधील एकाची १३ लाख रुपयांची फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी व्यक्तीने मोबाईल वर त्यांच्याशी संपर्क केला. स्टॉक मार्केटमध्ये ऑनलाईन माध्यमाव्दारे गुंतवणूक करुन चांगला परतावा … Read more

बार्शीतील ५० सेवाभावी डॉक्टरांचा यथोचित सत्कार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : नुतन लायनेस्टीक वर्ष १ जुलै व राष्ट्रीय डॉक्टर दिन याचे औचित्य साधून लायन्स क्लब बार्शी रॉयल चे अध्यक्ष ला.वर्षा गुंदेचा, खजिनदार ला.राजुल कांकरीया, वर्तमान हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड डॉ. कैवल्य गायकवाड यांचा हस्ते बार्शीतील ५० सेवाभावी डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम लायन्स क्लब बार्शी रॉयल व हिरेमठ हॉस्पिटल बार्शी … Read more

ताबा सुटल्याने कारचा भीषण अपघात; पाच ठार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील डाळज नं. १ हद्दीत कार चालकाचा ताबा सुटुन झालेल्या अपघातात फिरण्यासाठी गेलेल्या तेलंगणातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हे सर्वजण तेलंगणा राज्यातील असल्याची माहिती मिळत असून, हा अपघात एवढा भीषण … Read more

दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार तडीपार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली, भावडी तसेच परिसरात दहशत माजवून नागरिकांना त्रास देणाऱ्या गुन्हेगाराला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. रोहित उर्फ घोड्या सुनील चव्हाण (वय-२१ रा. जाधव वस्ती, भावडी रोड, वाघोली) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित चव्हाण यांच्या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात बेकायदेशीरित्या शस्त्र बाळगणे, … Read more

शिंदवणेत जुन्या भांडणातून तरुणावर कोयत्याने वार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या भांडणाच्या कारणावरून शिंदवणे येथील एका तरुणावर धारधार लोखंडी कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बस स्टॉपजवळ सोमवारी (ता. 01) सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी एकावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुष गणेष शेलार (रा. तेल्याचा मळा, … Read more