आवृत्ती पुणे

बहिणीला पळवून नेल्याने मुलाच्या वडिलांचा खून

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बहिणीला पळवून नेऊन आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे रागातून तिच्या भावाने मुलाच्या वडिलांवर कोयत्याने वार करून त्यांचा खून केला. ही घटना सोमवारी दुपारी ०१:३० वाजता येरवडा येथील राजीव गांधी नगर परिसरात घडली. येरवडा पोलिसांनी याप्रकरणी मुलीच्या भावासह दोघांना अटक केली. कठाळू कचरूबा लहाडे (वय ६०, रा. राजीव गांधी नगर, येरवडा) असे खून झालेल्या व्यक्तीचे … Read more

आषाढी वारीसाठी पुणे जिल्हा प्रशासन सज्ज

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान पंढरपूर, पालखी मार्ग, पालखी तळ आदी ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. विधान भवन पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र … Read more

आद्य क्रांतिगुरूंच्या स्मारकाच्या कामाचा आढावा

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे पुणे शहरात संगमवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या स्मारकाच्या कामाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. स्मारकाच्या पायांतर्गत सुरू असलेले पायलिंगचे काम जुलैच्या सुरुवाती पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे हे सर्वांना प्रेरणा देणारे महान व्यक्तीमत्व असून त्यांचे स्मारकही … Read more

शेतकऱ्यांनी घ्यावा एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्य शासनाने सुरू असलेल्या खरीप हंगामात केवळ १ रुपये भरुन पीक विम्याचा लाभ देण्याकरिता ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्यास मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांनी १५ जुलैपर्यंत नोंदणी करुन योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी तसेच ऐच्छिक … Read more

मांगडेवाडी येथे खुनाचा प्रयत्न करुन पसार झालेल्या आरोपीना केले जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांची सोलापुर व धाराशीव जिल्हयात कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मांगडेवाडी येथे खुनाचा प्रयत्न करुन पसार झालेल्या चार आरोपीना भारती विद्यापीठ ठाण्याच्या पोलिसांनी सोलापुर व धाराशीव जिल्हयात कारवाई करत अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मांगडेवाडी येथे खुनाचा प्रयत्न करून काहीजन फरार झाले होते. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा … Read more

आमदाराच्या पुतण्याने तरुणाला चिरडले

एकलहरे गावच्या हद्दीतील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने भरधाव कार चालवून एका तरुणाला चिरडल्याची घटना घडली आहे. खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयूर मोहिते पाटील याने जुना पुणे- नाशिक महामार्गावर एकलहरे गावच्या हद्दीत शनिवारी (दि. २२) रात्री साडेनऊच्या सुमारास भरधाव कार चालवून एका तरूणाला चिरडले. फॉर्च्यूनरने … Read more

कस्टडीतुन पळालेला आरोपी अवघ्या ४ तासात जेरबंद

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : युनिट-५ गुन्हे शाखा, पुणे शहर पोलीस कस्टडीतुन पलायन केलेल्या रेकॉर्डवरील आरोपीस अवघ्या ४ तासात जेरबंद करण्यात पोलीसाना यश आले आहे. पोलीसांनी संदिप बाबुलाल यादव (वय ३० वर्षे रा. जिल्हा परिषद शाळेसमोर, हांडेवाडी चौक, होळकरवाडी, पुणे), गोविंद उर्फ पिंट्या हनुमंत घोडखे (वय २४ वर्षे रा. गल्ली नंबर ५. वरदविनायक कॉलणी, गंगानगर, … Read more

मराठा युवकांनी टोकाचे पाऊल उचलू नये

खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी केले देठे कुटुंबियांचे सांत्वन महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : मराठा समाजातील युवकांनी टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी केले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या प्रसाद देठे यांच्या कुटुंबाची खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी पुण्यात भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. बार्शी येथील रहिवासी असलेले … Read more

लायन्स क्लब बार्शी टाउन अध्यक्षपदी एमजेएफ ला. महावीर कदम

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : येथील सामाजिक सेवा कार्याच्या क्षितिजावर अग्रेसर असणाऱ्या लायन्स क्लब बार्शी टाउनच्या अध्यक्षपदी युवा उद्योजक एमजेएफ ला. महावीर कदम यांची निवड झाली आहे. सचिव पदी ला. हेमंत जमदाडे, तर खजिनदारपदी ला.किरण आवटे यांची निवड झाली आहे. ही निवड 2024 – 25 वर्षासाठी आहे. ला. महावीर कदम हे लायन्स क्लब बार्शी टाउन … Read more

स्पर्धेत कष्ट व मेहनतीमुळेच मिळेल यश : संतोष पाटील

दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा बार्शीत सत्कार महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : आता सध्या सर्व क्षेत्रांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरु आहे.अकॅडमीक स्पर्धेमध्ये वाढ निर्माण झाल्यामुळे आपल्याला प्रचंड कष्ट व मेहनत करावी लागेल, मगच यश आपल्याला मिळेल असे प्रतिपादन अप्पर निबंधक तथा सहसचिव सहकार विभाग संतोष पाटील यांनी केले. येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेच्या इयत्ता … Read more