आवृत्ती पुणे

फटाके फोडणार्‍या आवाजाच्या ४५ सायलेन्सरवर फिरविला बुलडोझर

खराडी पोलिसांनी मॉडीफाईड सायलेन्सर बसविणार्‍या मोटारसायकलींवर केली कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : फटाक्यासारखा आवाज करणारा सायलेन्सर लावून लोकांना त्रास देणाºया ४५ बुलेटस्वारांना पकडून खराडी पोलिसांनी त्यांचे सायलेन्सर काढून त्याच्यावरुन बुलडोझर फिरवला. खराडी परिसरात बुलेट मोटारसायकलवरुन फिरणारे तरुण मुले बुलेट गाड्यांना असणारे मुळ कंपनीचे सायलेन्सर बदलुन त्या जागी दुसरे मॉडीफाईड सायलेन्सर बसतात. त्यातून फटाक्याचा मोठा … Read more

काँग्रेस प्रवक्ते हणुमंत पवार यांना पिस्तुल दाखवून मारहाण

टीव्ही चॅनेलवरील डिबेट शोमधील वादावादीचे कारण, तुषार दामगुडेंसह चौघांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : टीव्ही चॅनेलवरील डिबेट शोमध्ये झालेल्या वादातून काँग्रेसचे प्रवक्ते हणुमंत पवार यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे व त्यांच्या साथीदारांकडून पिस्तूल दाखवून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. याबाबत हणुमंत दिगंबर पवार (वय … Read more

पुण्यात गांजा पुरविणाऱ्या दोघांना नंदुरबार, धुळे येथून अटक

अंमली पदार्थविरोधी पथकाने चौघांकडून ४३ किलो गांजासह २१ लाखांचा माल केला जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कदमवाक वस्ती येथे गांजा विक्री करणाऱ्या दोघांना पकडून अंमली पदार्थविरोधी पथकाने ३४ किलो गांजा जप्त केला होता. त्यांना गांजा पुरविणाऱ्या दोघांना नंदुरबार व धुळे जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. मंगेश जाण्या पावरा (वय २९, रा. भोगावडे खुर्द, ता. … Read more

दरोड्याच्या तयारीतील चोरट्यांची टोळी गजाआड

वारजे माळवाडी पोलिसांची मोतीरामनगर येथे कारवाई; पाच सराईत गुन्हेगारांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे. वारजे माळवाडी येथील मोतीरामनगर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावाजवळ रविवारी सायंकाळी सुमारे पावणे आठ वाजता ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून कोयता, तलवार तसेच मिरची पूड असा मुद्देमाल जप्त … Read more

चार्टर्ड अकाउंटंटसह टिपू पठाणच्या साथीदाराला अटक

४३ लाखांच्या वसुलीसाठी व्यावसायिकाला दिली होती धमकी : खंडणीचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : व्यवसायाचे हिशोब पाहणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंटकडून हातउसने घेतलेले पैसे परत केल्यानंतरही त्याने ४३ लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यावर या चार्टर्ड अकाउंटंटने वसुलीसाठी टिपू पठाणच्या साथीदाराला सुपारी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हडपसर पोलिसांनी चार्टर्ड अकाउंटंटसह टिपू पठाणच्या … Read more

बार्शीतील बारंगुळे प्लॉट येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर

Ashok Saykar (DYSP) यांनी बार्शीकरांना शांतता, संयम व कायद्याला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रशासनास सहकार्य करा. सामाजिक सलोखा जपा. महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

ज्येष्ठ नागरिकाने ७ व्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या

विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीत फसवणूक : बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बाणेर येथील जागा विकसित करण्यासाठी दिली असताना करारानुसार मिळकतीमध्ये फ्लॅट न देता फसवणूक करून मानसिक त्रास दिल्याने, ज्या जागेवर इमारत उभी राहिली त्याच इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाने उडी मारून आत्महत्या केली. नरेश उमाकांत महाजन (वय ६९, रा. अंबरनाथ … Read more

दोन कोटींच्या फसवणूक प्रकरणात बेळगावहून दोघे सायबर चोरटे जेरबंद

व्हॉट्सअॅपवर कंपनीच्या मालकाच्या नावाने मेसेज करून केली फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : व्हॉट्सअॅपवर कंपनीचा मालक मेसेज करत असल्याचे (डीपीवर मालकाचा फोटो ठेवून) भासवून क्लायंटचे पेमेंट करायचे असल्याचे सांगत ‘मॅन इन मिडल’ सायबर फ्रॉडद्वारे कंपनीची १ कोटी ९५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी कर्नाटकातील बेळगाव येथून दोघांना अटक केली आहे. अजय रामविलास यादव (वय … Read more

लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षकाला अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पौड पोलीस ठाण्यात कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व गाडी जप्त न करण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ३५ हजार रुपये स्वीकारताना पौड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. सचिन बाळासाहेब शिंदे (वय ४५, रा. ग्रीन फ्लोरेन्सिया सोसायटी, सुसगाव, ता. … Read more

दहशत माजविण्यासाठी गुलटेकडीत गोळीबार

स्वारगेट पोलिसांनी चार अल्पवयीन गुन्हेगारांकडून २ पिस्तुले, ३ जिवंत काडतुसे जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सराईत अल्पवयीन गुन्हेगारांनी खंडणी उकळण्यासाठी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार केल्याची घटना गुलटेकडी येथे शुक्रवारी रात्री घडली. स्वारगेट पोलिसांनी तातडीने कारवाई करत चारही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ पिस्तुले व ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याबाबत … Read more