आवृत्ती पुणे

गँगस्टर नीलेश घायवळ टोळीवर तिसरी मोक्का कारवाई

व्यावसायिकाला धमकावून उकळली तब्बल ४४ लाख ३६ हजार रुपयांची खंडणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गँगस्टर नीलेश घायवळ टोळीवर पुणे पोलिसांनी तिसऱ्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. याप्रकरणी खंडणीचा गुन्हा वारजे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. कर्वेनगर आणि शिवणे परिसरातील मिलेनियम नॅशनल स्कूलमधील दोन शाळांतील विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ आणि … Read more

रिपब्लिकन सेनेच्या भूम तालुका अध्यक्षपदी मुकुंद लगाडे यांची निवड

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : रिपब्लिकन सेनेच्या भूम तालुका अध्यक्षपदी मुकुंद लगाडे यांची निवड करण्यात आली. ही निवड रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार, जिल्हा प्रभारी कपिल सरोदे आणि जिल्हाध्यक्ष अनिल हजारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली. या बैठकीस महिला आघाडी महाराष्ट्र सदस्या रेश्मा शेख, जिल्हाध्यक्ष मनिकरणा साखरे, धाराशिव तालुका अध्यक्ष गौतम बनसोडे, … Read more

आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी फुंकले रणशिंग

भूम नगर परिषद निवडणुकीची धुरा संजय गाढवे यांच्या हाती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना सज्ज झाली असून, या निवडणुकीची धुरा संजय गाढवे यांच्या हाती सोपवण्यात आली आहे. शिवसेनेला भूम शहरासह ग्रामीण भागात प्रचंड जनसमर्थन मिळत असल्याने या निवडणुकीत घवघवीत यश मिळेल, असा विश्वास माजी मंत्री व आमदार प्रा. … Read more

बावधन पोलीस दुय्यम निबंधक कार्यालयात छापा टाकणार, पार्थ पवारांशी संबंधीत कंपनीच्या जमीन व्यवहाराचे दस्त घेणार ताब्यात…

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

२४६ नगरपरिषद, ४२ नगर पंचायतीसाठी २ डिसेंबरला मतदान

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्य निवडणूक आयोगाने आज नगरपरिषद व नगरपंचायतींसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना लागली होती, तो कार्यक्रम अखेर आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला.आज झालेल्या पत्रकार परिषदेत आयोगाकडून या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात … Read more

महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून स्वावलंबी बनविणार : संयोगिता गाढवे

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : येणाऱ्या काळात शासनाच्या विविध योजना आणून महिलांना स्वावलंबी करण्याचे आमचे प्रयत्न राहणार आहेत, अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष संयोगिता संजय गाढवे यांनी दिली. भूम नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी सुटल्याने माजी नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्यावतीने भूम शहरातील महिलांची संवाद बैठक साहिल मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहामध्ये पार पडली. या बैठकीला … Read more

अहिल्यानगरमधील पोलिसांची चौकशी

घायवळ पारपत्र प्रकरणी पुणे पोलिसांकडून पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांना नोटीस महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळच्या पारपत्राची पोलीस पडताळणी करणाऱ्या अहिल्यानगरमधील अहमदपूर विभागातील तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना त्यांना नोटिशीद्वारे देण्यात … Read more

नीलेश घायवळचा पूर्वीचा साथीदार संतोष धुमाळसह तिघांवर ‘मोक्का’

तुझ्यामुळे मला अटक झाली : १० लाखांची मागणी केली होती खंडणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : “तुझ्यामुळे मला अटक झाली, १० लाख रुपये दे, नाहीतर गोळ्या खायला तयार राहा,” अशी धमकी देऊन तरुणाकडे खंडणी मागणाऱ्या गॅंगस्टर नीलेश घायवळचा एकेकाळचा साथीदार संतोष धुमाळ याच्यासह तिघांवर पोलिसांनी ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई केली आहे. संतोष आनंद धुमाळ, सागर गवासने … Read more